Content-Length: 196665 | pFad | https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B2

अस्वल - विकिपीडिया Jump to content

अस्वल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अस्वल
38–0 Ma
Late Eocene – Recent

शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: ऋक्षाद्य
योहान फिशर फॉन वाल्डहाइम, इ.स. १८१७
ध्रुवीय अस्वलाची मादी आपल्या पिलासोबत

अस्वल हा एक सस्तन प्राणी आहे. अस्वल प्रामुख्याने उत्तर गोलार्धात आढळतात, चष्मेवालं अस्वल मात्र दक्षिण अमेरिकेत सापडते. मुस्टेलॉइड(यामध्ये पंडाद्य, मिंकाद्य व राकूनाद्य कुळांचा समावेश होतो) व पिनिपेड हे त्यांचे सर्वात जवळचे नातेवाईक मानले जातात. जीवावशेषांवरून कुत्रा व अस्वल हे दोन्हीही एकाच पूर्वजाचे वंशज आहेत हे लक्षात येते.[]

पांडा सोडून सर्व अस्वले तपकिरी किव्हा काळ्या रंगाची असतात. ध्रुवीय अस्वलाची त्वचा देखिल काळ्या रंगाची, फक्त त्याचा केसांचा रंग पांढरा असतो[].

वर्गीकरण

[संपादन]

पांडाचे गुणधर्म अस्वले व रकून य दोघांशी मीळतेजुळते असल्यामुळे, त्याला अस्वलांच्या कुळात समाविष्ट कर्ण्यामधे वादविवाद् होते। परंतु दशकभराच्या विवादानंतर व जनुकांच्या अभ्यासावरून शास्त्रज्ञांनी त्याला समाविष्ट केले। त्यामुळे आता अस्वलांच्या एकूण ८ प्रजाती आहेत।

वर्णन

[संपादन]

अस्वले बोजड असतात व शरीराच्या मानाने त्यांचे पाय छोटे असतात.
ते त्यांचे मागील पाय पूर्ण टेकवून चालतात, तर इतर मांसाहारी प्राणी टाचांवर चालतात. अस्वले त्यांच्या मागील पायांवर उभी राहू शकतात किंवा बसू शकतात. जेव्हा त्यांना एखादा धोका जाणवतो तेव्हा, किंवा हवेतील वास हुंगण्यासाठी ते बहुधा मागील पायांवर उभे राहिलेले दिसतात.[]त्यांची दृष्टी कमकुवत असल्यामुळे देखील ते बऱ्याचदा अंदाज घ्यायला उभे राहतात. अस्वलांचे नाक खूप तीक्ष्ण असते, व त्यांचे खाद्य शोधायला ते नाकावरच अवलंबून असतात.भारतातील तपकिरी अस्वल(ब्राऊन बेअर) हे जवळजवळ १ ते दीड किलोमीटरवरून येणारा वास हुंगू शकते[].

खाद्य

[संपादन]

अस्वलांचे खाद्य वैविध्यपूर्ण असले तरी ते बव्हंशी अस्वले फळे, मुळे, किडे व मांस खातात. उत्तरेकडील ध्रुवीय अस्वल प्रामुख्याने समुद्रातील सस्तन प्राणी खातो(सील,वॉलरस इत्यादी), तर चीन मधील पांडा जातीचे अस्वल बांबू खातो. भारतातील अस्वल(स्लॉथ बेअर) हे प्रामुख्याने वाळव्या, मुंग्या व इतर किडे खाते. एका भोजनाच्या वेळी ते दहा हजार वाळव्या खाऊ शकते[].

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ प्रेटर, एस.एच. द बुक ऑफ इंडिyayaन अ‍ॅनिमल्स [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]] (इंग्रजी भाषेत). १७ डिसेंबर २०११ रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  2. ^ अ‍ॅनीमल्स(यंग डिस्कव्हरर सीरीज-डिस्कव्हरी चॅनल (इंग्रजी भाषेत).
  3. ^ बर्नी, डेव्हिड. द कन्साइज अ‍ॅनिमल एनसायक्लोपीडिया (इंग्रजी भाषेत).
  4. ^ नॅशनल जिओग्राफिक वाइल्ड - वर्ल्ड्‌स डेडलिएस्ट अ‍ॅनिमल्स
  5. ^ नॅशनल जिओग्राफिक वाईइ - वर्ल्ड्‌स डेडलिएस्ट अ‍ॅनिमल्स








ApplySandwichStrip

pFad - (p)hone/(F)rame/(a)nonymizer/(d)eclutterfier!      Saves Data!


--- a PPN by Garber Painting Akron. With Image Size Reduction included!

Fetched URL: https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B2

Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy