Content-Length: 195193 | pFad | https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8

लॉरा डर्न - विकिपीडिया Jump to content

लॉरा डर्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Laura Dern (es); Laura Dern (is); Laura Dern (ms); Лора Дърн (bg); Laura Dern (ro); 羅娜·丹 (zh-hk); Laura Dern (mg); Laura Dern (sv); Лора Дерн (uk); 蘿拉·鄧恩 (zh-hant); 劳拉·邓恩 (zh-cn); Laura Dern (uz); Laura Dern (eo); Laura Dern (cs); Laura Dern (pap); লরা ডার্ন (bn); Laura Dern (fr); 萝拉·邓恩 (zh-my); लॉरा डर्न (mr); Laura Dern (vi); Lora Derna (lv); Laura Dern (af); Лора Дерн (sr); Laura Dern (pt-br); 萝拉·邓恩 (zh-sg); Laura Dern (lb); Laura Dern (nn); Laura Dern (nb); Lora Dern (az); Laura Dern (smn); Laura Dern (en); لورا ديرن (ar); 羅娜丹 (yue); Laura Dern (hu); Laura Dern (eu); Laura Dern (ast); لورا درن (azb); Laura Dern (cy); Laura Dern (ga); لورا درن (fa); 蘿拉·鄧恩 (zh); Laura Dern (da); ლორა დერნი (ka); ローラ・ダーン (ja); لورا ديرن (arz); לורה דרן (he); Laura Dern (la); लौरा डर्नी (hi); Laura Dern (fi); Laura Dern (it); Laura Dern (nl); 劳拉·邓恩 (zh-hans); Laura Dern (ht); Laura Dern (et); 蘿拉·鄧恩 (zh-tw); Laura Dernová (sk); Laura Dern (pt); لۆرا دێرن (ckb); Laura Dern (yo); Laura Dern (nan); Lora Dern (sr-el); Laura Dern (sco); Laura Dern (ca); Лора Дерн (sr-ec); Laura Dern (tr); Laura Dern (sl); Laura Dern (tl); Laura Dern (id); Լորա Դերն (hy); ลอร่า เดิร์น (th); Laura Dern (pl); ലോറാ ഡേൺ (ml); Laura Dern (sh); Laura Dern (kl); Лора Дерн (ru); Laura Dern (de); Laura Dern (sq); Laura Dern (gl); 로라 던 (ko); Λόρα Ντερν (el); ਲੋਰਾ ਡੇਰਨ (pa) actriz estadounidense (es); amerikai színésznő (hu); aktore estatubatuarra (eu); actriz estauxunidense (ast); американская актриса (ru); US-amerikanische Schauspielerin (de); aktore amerikane (sq); تهیه‌کننده، صداپیشه، بازیگر، و کارگردان آمریکایی (fa); американска актриса (bg); United States of America artist ŋun nyɛ paɣa (dag); Amerikalı film yapımcısı ve sinema oyuncusu (tr); アメリカの女優 (ja); americká herečka, režisérka a producentka (sk); שחקנית אמריקאית (he); 美國女演員 (zh-hant); yhdysvaltalainen näyttelijä (fi); usona aktoro (eo); americká herečka, režisérka a filmová producentka (cs); aktor merikano (pap); attrice, doppiatrice e produttrice statunitense (it); মার্কিন অভিনেত্রী (bn); actrice américaine (fr); amerikanesch Schauspillerin (lb); ameerika näitleja (et); އެމެރިކާއަށް އުފަން އެކްޓްރެސެއް (dv); американська акторка та продюсерка (uk); American actress and producer (en); American actress and producer (en); Òṣèré Ọmọ Orílẹ̀-èdè America (yo); amerikansk skådespelare (sv); nữ diễn viên người Mỹ (vi); ամերիկացի դերասան, ռեժիսոր, պրոդյուսեր (hy); amerikansk skodespelar (nn); Amerikaanse aktrise (af); atriz americana (pt); Amerikaans actrice (nl); അമേരിക്കന്‍ ചലചിത്ര നടന്‍ (ml); actriță americană (ro); amerikansk skuespiller (da); pemeran perempuan asal Amerika Serikat (id); amerykańska aktorka (pl); amerikansk skuespiller, regissør og filmprodusent (nb); ABŞ aktrisası (az); actriu estatunidenca (ca); cyfarwyddwr ffilm, cynhyrchydd ac actores a aned yn Los Angeles yn 1967 (cy); 美国女演员 (zh); ovtâstumstaatâlâš čaittâleijee (smn); actriz estadounidense (gl); ممثلة أمريكية (ar); Αμερικανίδα ηθοποιός, σκηνοθέτης και παραγωγός (el); 미국 배우 (ko) Laura Elizabeth Dern (es); Dr. Ellie Sattler (ca); Laura Elizabeth Dern (et); Laura Elizabeth Dern (eu); 罗拉·邓恩 (zh-my); Laura Elizabeth Dern (ast); Laura Dern, Лаура Дерн, Дёрн, Лора, Дерн, Лора, Лора Дёрн (ru); Laura Dern, Laura Elizabeth Dernová (sk); Laura Elizabeth Dern (de); Laura Elizabeth Dern (pt); Laura Elizabeth Dern (gl); لرا درن (fa); Laura Dern, 劳拉·邓恩 (zh); Laura Elizabeth Dern, Laura Dern (sr); Laura Elizabeth Dern (ro); Si Laura Elizabeth Dern (tl); Laura Elizabeth Dern (nn); Laura Elizabeth Dern-Harper (fi); Laura Elizabeth Dern (id); Laura Elizabeth Dern-Harper (pl); Laura Elizabeth Dern (nb); Dern, Lora Dern, Laura Elizabeth Dern (sh); Laura Elizabeth Dern (da); Laura Elisabetha Dern (la); Laura Elizabeth Dern (ms); Laura Elizabeth Dern, Laura Elizabeth Dern-Harper (smn); Laura Elizabeth Dern-Harper, Laura Elizabeth Dern (en); Dern, Laura Elizabeth Dern (sv); Laura Elizabeth Dern (vi); 로라 엘리자베스 던 (ko)
लॉरा डर्न 
American actress and producer
Лора Дерн в 2017 году
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावLaura Dern
जन्म तारीखफेब्रुवारी १०, इ.स. १९६७
लॉस एंजेलस
Laura Elizabeth Dern
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९७३
नागरिकत्व
निवासस्थान
शिक्षण घेतलेली संस्था
  • Lee Strasberg Theatre and Film Institute
  • The Buckley School
व्यवसाय
मातृभाषा
  • American English
वडील
  • Bruce Dern
आई
  • Diane Ladd
अपत्य
  • Ellery Harper
  • Jaya Harper
वैवाहिक जोडीदार
  • Ben Harper (इ.स. २००५ – इ.स. २०१३)
सहचर
पुरस्कार
स्वाक्षरी
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

लॉरा एलिझाबेथ डर्न (जन्म १० फेब्रुवारी १९६७) एक अमेरिकन अभिनेत्री आहे. एक अकादमी पुरस्कार, एक प्राइमटाइम एमी अवॉर्ड, एक बाफ्टा अवॉर्ड आणि पाच गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स यासह ती अनेक पुरस्कारांची प्राप्तकर्ता आहे.

ब्रूस डर्न आणि डियान लॅड या अभिनेत्यांच्या पोटी जन्मलेल्या, लॉराने १९८० च्या दशकात अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली आणि मास्क (१९८५), ब्लू वेल्वेट (१९८६) आणि वाइल्ड ॲट हार्ट (१९९०) मधील तिच्या अभिनयामुळे प्रसिद्ध झाली. रॅम्बलिंग रोझ (१९९१) या नाट्य चित्रपटातील तिच्या शीर्षकाच्या अनाथ मुलीच्या भूमिकेसाठी तिला तिचे पहिले अकादमी पुरस्कार नामांकन मिळाले आणि आफ्टरबर्न (१९९२) या दूरचित्रवाणी चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी तिला पहिला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. स्टीव्हन स्पीलबर्गच्या जुरासिक पार्क (१९९३) या साहसी चित्रपटातील एली सॅटलरच्या भूमिकेसाठी तिला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली, ही भूमिका तिने नंतर ज्युरासिक पार्क ३ (२००१) आणि ज्युरासिक वर्ल्ड डोमिनियन (२०२२) या भागांमध्ये पुन्हा साकारली.

दूरचित्रवाणी चित्रपट रिकाउंट (२००८) मधील कॅथरीन हॅरिस (फ्लोरिडा येथील अमेरिकन रिपब्लिकन राजकारणी) आणि कॉमेडी मालिका एनलाईटेन्ड (२०११-२०१३) मधील ॲमी जेलिकोच्या भूमिकेसाठी दोन गोल्डन ग्लोब जिंकल्यानंतर, डर्नने चेरिल स्ट्रेडची (अमेरिकन लेखीका) आई म्हणून तिच्या अभिनयासाठी तिचे दुसरे अकादमी पुरस्कार नामांकन मिळवले; बायोपिक वाइल्ड (२०१४) या चित्रपटासाठी. २०१७ आणि २०१९ मध्ये, तिने बिग लिटल लाईज या नाट्य मालिकेत रेनाटा क्लेन म्हणून काम केले व प्राइमटाइम एमी अवॉर्ड आणि गोल्डन ग्लोब अवॉर्ड जिंकला. स्टार वॉर्स: द लास्ट जेडाय (२०१७), लिटल वुमन (२०१९), आणि मॅरेज स्टोरी (२०१९) या चित्रपटांमध्ये तिने सहाय्यक भूमिका केल्या होत्या. यातील शेवटच्या चित्रपटात घटस्फोटाचा वकील म्हणून तिने केलेल्या कामगिरीमुळे तिला अकादमी पुरस्कार आणि तिचा पाचवा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला.

वैयक्तिक जीवन

[संपादन]

लॉरा एलिझाबेथ डर्नचा जन्म १० फेब्रुवारी १९६७ रोजी लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथे झाला.[][][][] अभिनेते डियान लॅड आणि ब्रूस डर्न यांची मुलगी आणि युटाचे माजी गव्हर्नर आणि युद्ध सचिव जॉर्ज डर्न यांची नात. तिचे पालक द वाइल्ड एंजल्सचे चित्रीकरण करत असताना डियानला गर्भधारणा झाली.[] कवी, लेखक आणि काँग्रेसचे ग्रंथपाल आर्चीबाल्ड मॅकलीश हे तिच्या नात्यात होते. जेव्हा ती दोन वर्षांची होती तेव्हा तिच्या पालकांनी घटस्फोट घेतल्यानंतर, डर्नचे पालनपोषण मोठ्या प्रमाणात तिची आई आणि आजी, मेरी यांनी केले. तिची आजी ओस्लो येथून नॉर्वेजियन वंशाची होती. तिचे पालनपोषण कॅथोलिक झाले. तिची गॉडमदर अभिनेत्री शेली विंटर्स होती.[] तिला लहानपणी स्कोलियोसिस झाला. []

तिचा पहिला चित्रपट व्हाईट लाइटनिंग (१९७३) मधील अतिरिक्त भूमिकेत होता, ज्यामध्ये तिच्या आईने अभिनय केला होता.[] तिचे अधिकृत चित्रपट पदार्पण ॲलिस डजंट लिव्ह हिअर एनीमोर (१९७४) मध्ये तिच्या आईच्या सोबत होते.[] १९८२ मध्ये, फक्त १५ वर्षांच्या डर्नने गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात ट्रॉफी आणायचे काम केले.[] त्याच वर्षी, लेडीज अँड जेंटलमेन, द फॅब्युलस स्टेन्स या चित्रपटात तिने बंडखोर रॉक बँड सदस्याची भूमिका साकारली.[१०]

वैयक्तिक जीवन

[संपादन]

डर्न १९८५ ते १९८९ पर्यंत तिचा ब्लू वेल्वेट को-स्टार काइल मॅक्लाचलानसोबत संबंधामध्ये होती. ज्युरासिक पार्कच्या सेटवर भेटल्यानंतर तिने १९९३ मध्ये जेफ गोल्डब्लम सोबत संबंधांना सुरुवात केली, परंतु १९९७ मध्ये हे नाते संपुष्टात आले. डर्नने १९९७ ते १९९९ या काळात बिली बॉब थॉर्न्टन सोबत होती पण त्याने अँजेलिना जोलीशी लग्न केले. संगीतकार बेन हार्पर आणि डर्न यांनी २३ डिसेंबर २००५ रोजी लॉस एंजेलिस येथील त्यांच्या घरी लग्न केले.[११] [१२] त्यांना दोन मुले आहेत, मुलगा एलेरी वॉकर (जन्म २१ ऑगस्ट २००१) [११] आणि मुलगी जया (जन्म नोव्हेंबर २००४).[१३] पण दोघांनी २०१३ मध्ये घटस्फोट घेतला.[१४]

१८ ऑक्टोबर २०१७ रोजी, हार्वे वाइनस्टीन लैंगिक शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, डर्न द एलेन डीजेनेरेस शोमध्ये दिसली आणि तिने उघड केले की वयाच्या १४ व्या वर्षी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता.[१५]

एक कार्यकर्ता आणि विविध धर्मादाय संस्थांचे समर्थक, डर्नने ॲबिलिटी मॅगझिनच्या कव्हर स्टोरीमध्ये डाउन सिंड्रोम जनजागृतीची वकिली केली. [१६] ती महिलांच्या हक्कांसाठी,[१७] लैंगिक वेतन समानता,[१८] तसेच बंदूक हिंसा आणि हवामान बदल यांच्याशी लढण्यासाठी देखील वकीली करते.[१९] २०१९ मध्ये, ती अकादमी म्युझियम ऑफ मोशन पिक्चर्सची बोर्ड सदस्य बनली.[२०] डर्न हे अमेरिकन फुफ्फुस असोसिएशनची राजदूत आहेत आणि समूहाच्या राष्ट्रीय संचालक मंडळाचे सल्लागार म्हणून काम करतात.[२१] [२२]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ DIET, PHYSICAL ACTIVITY, DIETARY SUPPLEMENTS, LIFESTYLE AND HEALTH. BiblioGov. July 25, 2002. p. 33. ISBN 978-1983541629. March 9, 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. November 14, 2020 रोजी पाहिले.
  2. ^ a b Harrington, Richard (September 14, 2007). "The Essential Roger Corman". The Washington Post. ISSN 0190-8286. October 9, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. March 12, 2016 रोजी पाहिले. Dern's real-life wife, Diane Ladd, playing the Loser's wife, became pregnant with daughter-actress Laura Dern during shooting.
  3. ^ Diamond, Jamie (August 25, 1992). "A Lifetime of con men and killers". Toledo Blade. February 26, 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 12, 2016 रोजी पाहिले. In 1967 I did a movie with Peter Fonda called The Trip... I had just had my daughter Laura
  4. ^ "Showtime movie a family affair". Spartanburg Herald Journal. January 28, 1996. February 26, 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 12, 2016 रोजी पाहिले.
  5. ^ "How the Dern Family Survived Career Setbacks, Embarrassing Set Moments". The Hollywood Reporter. October 28, 2010. February 28, 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. February 27, 2020 रोजी पाहिले.
  6. ^ Arnold, Amanda (December 19, 2019). "Laura Dern Is So Good at Sitting". The Cut. January 17, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 24, 2020 रोजी पाहिले.
  7. ^ Ellison, Nancy; Manning, Barbara (April 29, 1985). "Laura Dern, Daughter of Bruce (and Diane Ladd) Steps Out on Her Own with a Star Role in Mask". People. August 3, 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 14, 2020 रोजी पाहिले.
  8. ^ Kempley, Rita (January 12, 1997). "Laura Dern's Liberal Lust". The Washington Post. December 10, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 10, 2019 रोजी पाहिले.
  9. ^ VanHoose, Benjamin (January 6, 2020). "Laura Dern Recalls Being Miss Golden Globe in 1982: My Grandma Drove Me Up in Her Toyota Corolla". People. April 18, 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 14, 2020 रोजी पाहिले.
  10. ^ Powers, Ann (September 14, 2008). "'Fabulous' determination". Los Angeles Times. May 14, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 14, 2020 रोजी पाहिले.
  11. ^ a b Miller, Samantha (February 4, 2002). "Dern Happy". People. February 27, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 27, 2020 रोजी पाहिले.
  12. ^ "Actress Laura Dern Marries Ben Harper". People. December 23, 2005. January 14, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. September 21, 2013 रोजी पाहिले.
  13. ^ "Laura Dern gives birth to a daughter". Today. November 2004. February 28, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 27, 2020 रोजी पाहिले.
  14. ^ Saad, Nardine (September 11, 2013). "Laura Dern, Ben Harper finalize their long-running divorce". Los Angeles Times. September 10, 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 10, 2020 रोजी पाहिले.
  15. ^ Fisher, Luchina (October 18, 2017). "Laura Dern recalls being sexually assaulted at age 14". Elle. February 24, 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. February 23, 2018 रोजी पाहिले.
  16. ^ "Laura Dern interview with Chet Cooper". Abilitymagazine.com. April 27, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. August 31, 2016 रोजी पाहिले.
  17. ^ Brockington, Ariana (May 22, 2018). "Nina Shaw, Laura Dern Stress Importance of Intersectionality in Time's Up Movement". Variety. August 3, 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 10, 2020 रोजी पाहिले.
  18. ^ Franklin, Ericka (April 30, 2019). "Laura Dern Promotes Gender Parity Across Industries at Women in Tech Code-a-Thon". The Hollywood Reporter. August 5, 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 10, 2020 रोजी पाहिले.
  19. ^ Tschorn, Adam (December 12, 2019). "2019 is Laura Dern's year. We're just living in it". Los Angeles Times. September 10, 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 10, 2020 रोजी पाहिले.
  20. ^ Robb, David (November 6, 2019). "Academy Museum Names Seven New Trustees, Including Laura Dern & Academy President David Rubin". Deadline Hollywood. December 4, 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. August 31, 2020 रोजी पाहिले.
  21. ^ Conway, Jeff. "Laura Dern Talks Lung Health And Opens Up About Her 'Jurassic' Return". Forbes (इंग्रजी भाषेत). August 21, 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-08-21 रोजी पाहिले.
  22. ^ "Laura Dern". www.lung.org (इंग्रजी भाषेत). June 14, 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-08-21 रोजी पाहिले.








ApplySandwichStrip

pFad - (p)hone/(F)rame/(a)nonymizer/(d)eclutterfier!      Saves Data!


--- a PPN by Garber Painting Akron. With Image Size Reduction included!

Fetched URL: https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8

Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy