बोईंग ७७७
बोईंग ७७७ | |
---|---|
युनायटेड एअरलाइन्सचे ७७७-२०० | |
प्रकार | लांब पल्ल्याचे मोठ्या क्षमतेचे दुहेरी जेट विमान |
उत्पादक | बोईंग |
समावेश | जून ७, १९९५ |
सद्यस्थिती | प्रवासीवाहतूक सेवेत |
उपभोक्ते | एमिराट्स एअरलाइन्स, सिंगापूर एअरलाइन्स, एर फ्रांस, युनायटेड एअरलाइन्स एर इंडिया |
उत्पादित संख्या | ८६० (एप्रिल २०१०) |
प्रति एककी किंमत | अमेरिकन डॉलरमध्ये २० कोटी ५५ लाख - २३ कोटी १० लाख (७७७-२००ईआर) २३ कोटी ७५ लाख - २६ कोटी ३५ लाख (७७७-२००एलआर) २५ कोटी ७० लाख - २८ कोटी ६५ लाख (७७७-३००ईआर) २५ कोटी २५ लाख - २६ कोटी ५ लाख (७७७एफ) |
बोईंग ७७७ हे बोईंग कंपनीचे खूप मोठ्या प्रवासी क्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. ट्रिपल सेव्हन असे अनधिकृत नाव असलेले हे विमान दोन इंजिने असलेले जगातील सगळ्यात मोठे विमान आहे.[१] या विमानातून ३००पेक्षा अधिक प्रवासी ९,३८० किमी अंतर जाऊ शकतात. हे विमान आता मोठ्या आकाराच्या जुन्या विमानां जागा हे हळूहळू घेऊ लागले आहे. बोईंग ७६७ या मध्यम क्षमतेच्या व बोईंग ७४७ या मोठ्या क्षमतेच्या विमानांच्या मध्ये ७७७ची क्षमता बसते.
जगातील सगळ्यात मोठ्या आकाराची इंजिने, प्रत्येकी सहा चाके असलेली लॅंडिंग गियर्स[मराठी शब्द सुचवा] आणि गोलाकृती क्रॉस सेक्शन[मराठी शब्द सुचवा] ही या विमानाची काही वैशिष्ट्ये आहेत. या विमानाची रचना करताना बोईंगने आठ प्रमुख विमानकंपन्याची मते घेतली. संपूर्ण रचना संगणकावर (पूर्वीप्रमाणे कागदावर न करता) केली गेली.
७७७ चे लांबीनुसार दोन प्रकार आहेत. १९९५पासून तयार केले गेलेले ७७७-२००, १९९७पासूनचे ७७७-२००ईआर आणि १९९८पासून तयार केले गेलेले ३३.३ फूट अधिक लांबीचे ७७७-३००ईआर. अधिक लांब पल्ला असलेले ७७७-३००ईआर आणि ७७७-२००एलआर अनुक्रमे २००४ आणि २००६ पासून कार्यरत आहेत तर सामानवाहतूकीसाठीचे ७७७एफ २००८पासून सेवेत आहे. मालवाहू तसेच लांब पल्ल्याच्या उपप्रकारांना जी.ई. ९०, प्रॅट अँड व्हिटनी पीडब्ल्यू४००० किंवा रोल्स-रॉइस ट्रेंट ८०० प्रकारची इंजिने लावलेली असतात. ७७७-२००एलआर प्रकारचे विमान जगातील सगळ्यात लांब पल्ल्याच्या प्रवासी विमानांपैकी एक आहे. हवेत इंधन न भरता सगळ्यात लांबचा प्रवास करण्याचा विक्रम याच्या नावावर आहे. हे विमान मुंबई तसेच दिल्लीपासून न्यूअर्क, न्यू जर्सी पर्यंत न थांबता जाते.
१९९५मध्ये युनायटेड एरलाइन्सच्या सेवेत रुजू झाल्यानंतर नोव्हेंबर इ.स. २०१०च्या सुमारास अंदाजे ६० गिऱ्हाइकांनी १,१६० विमानांची मागणी नोंदवली आहे. पैकी ९०२ विमाने त्यांना सुपूर्द करण्यात आली आहेत.[२] ४१५ विकलेल्या विमानांसह ७००-२००ईआर प्रकाराचा खप सर्वाधिक आहे. एमिराट्स एरलाइन्सकडे सर्वाधिक ८६ ७७७ विमाने आहेत. ऑक्टोबर २०१०पर्यंत ७७७ प्रकारच्या विमानांना एक मोठा अपघात झाला असून त्यातील विमान नष्ट झाले आहे. हा अपघात ट्रेंट इंजिनात बिघाड झाल्यामुळे घडला.
ईतर विमानांपेक्षा प्रतिप्रवासी-प्रतिकिलोमीटर कमी इंधनवापर असलेले ७७७ अधिक लोकप्रिय होत आहे व समुद्रापलीकडील लांब पल्ल्यांच्या मार्गांवर याचा वापर सर्वाधिक होतो. जानेवारी २०२२पर्यंत ६० वेगवेगळ्या विमानवाहतूक कंपन्यांनी २,०९५ नमून्यांची मागणी नोंदवली होती. त्यापैकी १,६७८ विमाने गिऱ्हाइकांना हस्तांतरित झालेली होती.[२]
एरबस ए-३३०, एर बस ए-३४० तसेच एरबस ए-३५० एक्स.डब्ल्यू.बी. या प्रकारची विमाने ७७७ चे थेट स्पर्धक आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Robertson, David. "Workhorse jet has been huge success with airlines that want to cut costs". 2011-06-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 20, 2009 रोजी पाहिले.
- ^ a b "777 Model Orders and Deliveries summary". Boeing. September 2010. 2015-10-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. October 9, 2010 रोजी पाहिले.