Content-Length: 217498 | pFad | http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%8B

नेप्यिडॉ - विकिपीडिया Jump to content

नेप्यिडॉ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नेपिडो या पानावरून पुनर्निर्देशित)
नेपिडो

Naypyidaw
बर्मा देशाची राजधानी
नेपिडो is located in बर्मा
नेपिडो
नेपिडो
नेपिडोचे बर्मामधील स्थान

गुणक: 19°45′N 96°6′E / 19.750°N 96.100°E / 19.750; 96.100

देश म्यानमार ध्वज म्यानमार
राज्य -
स्थापना वर्ष इ.स. २००६
महापौर थेन न्युन्त
क्षेत्रफळ ४,६०० चौ. किमी (१,८०० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ९,३०,०००


नेप्यिडॉ ही म्यानमार देशाची नवी राजधानी आहे. नेप्यिडॉ ह्या शब्दाचा बर्मी भाषेमध्ये राजांचे शहर असा होतो. ६ नोव्हेंबर २००५ रोजी बर्माच्या लष्करी राजवटीने देशाची राजधानी यांगून शहरातून नेपिडो ह्या पुर्णपणे नव्याने विकसित करण्यात आलेल्या जागी हलवल्याचे जाहीर केले. यांगून ह्या किनारपट्टीच्या शहरापेक्षा नेपिडो ह्या देशाच्या मध्यवर्ती असलेल्या ठिकाणाहून राज्यकारभार सांभाळणे सोपे जाईल तसेच यांगून शहर अत्यंत वर्दळीचे व गर्दीचे झाले आहे ह्या कारणास्तव राजधानी हलवल्याचे राजवटीने स्पष्ट केले. पण ही कारणीमीमांसा बहुसंख्य बर्मी जनतेला अयोग्य व अतर्किक वाटली आहे.

नेपिडो शहर यांगूनच्या ३२० किमी उत्तरेला वसले आहे. २४वी आणि २५वी आसियान शिखर परिषद तसेच ९वी पूर्व आशिया शिखर परिषद नेपिडो शहरात भरली होती.

इतिहास

[संपादन]

नेप्यिडॉचा इतिहास अल्प आहे. २००२ साली शहराचे बांधकाम सुरू करण्यात आले. बांधकामासाठी म्यानमारच्या सरकारने किमान २५ कंपन्यांना नेमले होते. ६ नोव्हेंबर २००५ या दिवशी सरकारी मंत्रालयांच्या यांगूनहून नेपिडोला स्थानांतरास सुरुवात झाली.

२७ मार्च २००६ या दिवशी सशस्त्र दल दिनाच्या निमित्ताने १२००० पेक्षा जास्त सैनिक नव्या राजधानीतील पहिल्या संचलनात सहभागी झाले. हा नेपिडोमधील पहिला मोठ्या प्रमाणावरचा सार्वजनिक सोहळा ठरला. ह्या सोहळ्याच्या दरम्यानच शहराचे नेपिडो असे नामकरण करण्यात आले.

हे सुद्धा पहा

[संपादन]

नेप्यिडॉ केंद्रशासित प्रदेश









ApplySandwichStrip

pFad - (p)hone/(F)rame/(a)nonymizer/(d)eclutterfier!      Saves Data!


--- a PPN by Garber Painting Akron. With Image Size Reduction included!

Fetched URL: http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%8B

Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy