Jump to content

सॅमसंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साचा:माहितीचौकट कंपनी. सॅमसंग ही दक्षिण कोरियामधील एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. सॅमसंग ह्या नावाखाली अनेक विविध गट कार्यरत असून सॅमसंग ही कोरियामधील सर्वात मोठी कंपनी आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग हेवी इंडस्ट्रीज ह्या सॅमसंग परिवारामधील प्रमुख कंपन्या आहेत. सॅमसंगची स्थापना 1938 मध्ये ली ब्युंग-चुल यांनी ट्रेडिंग कंपनी म्हणून केली होती. पुढील तीन दशकांत, समूहाने अन्न प्रक्रिया, कापड, विमा, सिक्युरिटीज आणि किरकोळ विक्री या क्षेत्रांमध्ये विविधता आणली. सॅमसंगने 1960 च्या दशकाच्या उत्तरार्धात इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात प्रवेश केला आणि 1970 च्या दशकाच्या मध्यात बांधकाम आणि जहाजबांधणी उद्योगात प्रवेश केला; 1987 मध्ये लीच्या मृत्यूनंतर, सॅमसंग चार व्यवसाय गटांमध्ये विभागला गेला - सॅमसंग ग्रुप, शिनसेग ग्रुप, सीजे ग्रुप आणि हॅन्सोल ग्रुप. 1990 पासून, सॅमसंगने जागतिक स्तरावर त्याच्या क्रियाकलाप आणि इलेक्ट्रॉनिक्सचा विस्तार केला आहे; विशेषतः, त्याचे मोबाईल फोन आणि सेमीकंडक्टर हे उत्पन्नाचे सर्वात महत्वाचे स्रोत बनले आहेत.

2019 मध्ये सॅमसंगचा महसूल (उत्पन्न) $305 अब्ज, 2020 मध्ये $107+ अब्ज आणि 2021 मध्ये $236 अब्ज आहे.[]

सॅमसंग कंपनीचा इतिहास

[संपादन]
  • १९३८ मध्ये ली-ब्युंग-च्युलने ही कंपनी किराणा मालाचे दुकान म्हणून सुरू केली.
  • १९४० मध्ये किराणा व्यापारातल्या अतिस्पर्धेमुळे शिल्लक मालातून त्यांनी ‘नूडल्स’ बनवून विकायला सुरुवात केली.
  • १९५० मध्ये नूडल्सचा व्यवसाय सोडून साखर उत्पादन करायला सुरुवात केली.
  • १९५४ मध्ये त्यांनी साखर सोडून चक्क लोकरीचे कपडे तयार करून विकायला सुरुवात केली.
  • १९५६ मध्ये लोकरीचे कपडे सोडून वेगळाच म्हणजे विमा आणि ठेवींचा व्यवसाय सुरू केला.
  • १९६० मध्ये विमा आणि ठेवींचा व्यवसाय सोडून ते ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच्या उत्पादनात उतरले.
  • १९८० मध्ये त्यांनी टेलिफोनचे स्विचबोर्ड बनवण्याकडे आपला मोर्चा वळवला.
  • १९८७ संस्थापक-मालक ‘ली’ मरण पावले. त्यानंतर कंपनीचे डिपार्टमेंटल स्टोअर, रासायनिक आणि पुरवठा, कागद/टेलिफोन आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स अशा चार भागात विभाजन झाले. त्याच वर्षी त्यांनी सेमी कंडक्‍टर्समध्ये आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करण्याकडे आपलं लक्ष केंद्रित केले.
  • १९९० च्या दशकात, दक्षिण आशियाई सेमी कंडक्‍टर्समध्ये आपली गुंतवणूक करत असताना, यांनी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक सोडून ‘रिअल इस्टेट’मध्ये लक्ष घातले. अल्पावधीतच मलेशियात जगातले सध्याचे सगळ्यात उंचीचे पेट्रोनास टॉवर्स, तैवानमध्ये तैपई, दुबईत प्रसिद्ध ‘बुर्ज खलिफा’ या उत्तुंग इमारती बांधल्या.
  • १९९३ मध्ये नवीन सीईओ झालेल्या लीच्या मुलानी जागतिक मंदीमुळे कंपनीचा अवास्तव आकार कमी करून (डाउनसायझिंग) लहान उपकंपन्या विकून टाकून सॅमसंग कंपनी पुन्हा एकत्र केली. सगळ्या कंपन्या एकत्र केल्यावर ‘मेमरी चिप्स’ बनवणारी ही जगातली सगळ्यांत मोठी कंपनी बनली.
  • १९९५ मध्ये त्यांनी ‘एलसीडी स्क्रीन्स’ बनवायला सुरुवात केली आणि दहा वर्षात फ्लॅट स्क्रीन दूरचित्रवाणी बनवणारे ते जगातले सगळ्यात मोठे उत्पादक बनले.
  • २०१० मध्ये एलसीडी क्षेत्रातल्या गळेकापू स्पर्धेनंतर त्यांनी पुढच्या दहा वर्षाच्या व्यवसायवृद्धीची योजना आखली.
  • सध्या (२०१६ साली) आयफोनपेक्षाही दुपटीने फोन विकत, आता ते जगातले सगळ्यात मोठे मोबाईल फोन निर्माते बनले आहेत.
  • दक्षिण कोरियाच्या निर्यातीतला वीस टक्के वाटा फक्त एकट्या ‘सॅमसंग’चा आहे.
  • सॅमसंगची २०१६ सालची वार्षिक विक्री २५० बिलियन डॉलर्स आहे; म्हणजे रुपयांत साधारण १,६२,५०,००,००,००० रुपये.

बाह्य दुवे

[संपादन]
  1. ^ "Samsung Net Worth". 2022-09-24. 2022-09-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-10-03 रोजी पाहिले.
pFad - Phonifier reborn

Pfad - The Proxy pFad of © 2024 Garber Painting. All rights reserved.

Note: This service is not intended for secure transactions such as banking, social media, email, or purchasing. Use at your own risk. We assume no liability whatsoever for broken pages.


Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy