झामोरिन
Appearance
झामोरिन (मल्याळम: സാമൂതിരി, पोर्तुगीज: Samorim, डच: Samorijn) हे मध्ययुगीन केरळमधील कोळिकोडच्या राजतंत्राच्या हिंदू नायर राज्यकर्त्याचे अधिकृत पद होते. सुमारे १२व्या शतकापासून ते १८व्या शतकाच्या अखेरपर्यंत कोळिकोडवर झामोरिनांचे शासन होते.
प्रसिद्ध पोर्तुगीज खलाशी व शोधक वास्को दा गामा इ.स. १४९८ मध्ये ३ जहाजे व १७० सहकाऱ्यांसह कोळिकोडजवळ पोचला व त्याने तेथील झामोरिनसोबत व्यापार व वाणिज्य करार केले. युरोपीय वसाहतावाद्यांची भारतीय उपखंडातील शासकांसोबत ही पहिलीच भेट मानले जाते.