हुआन सांतामरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ
Appearance
हुआन सांतामरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: SJO, आप्रविको: MROC) हा कॉस्टा रिकाची राजधानी सान होजे शहराला सेवा देणारा विमानतळ आहे. या विमानतळाला १८५६मध्ये अमेरिकन सैन्याशी लढताना ठार झालेल्या ढोलवादक हुआन सांतामरिया या मुलाचे नाव दिलेले आहे.
या विमानतळावर आव्हियांका कोस्ता रिका, कॉस्टा रिका ग्रीन एरवेझ, सान्सा एरलाइन्स, व्होलारिस कोस्ता रिका आणि कोपा एरलाइन्सची ठाणी आहेत. येथून मध्य अमेरिकेतील बव्हंश शहरांना तसेच उत्तर, दक्षिण अमेरिका तसेच जगातील प्रमुख शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे.